
Raigad Boat Sunk: रायगड जिल्ह्यातील करंजा गावानजीकच्या समुद्र किनाऱ्याजवळ एका बोटीला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही बोट समुद्रात बुडाल्याने अनेक खलाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासन आणि नौदलाने तातडीने बचावकार्य हाती घेतले आहे. ही घटना नेमकी कशी घडली आणि त्यामागील कारणे काय, याबाबत सध्या तपास सुरू आहे.