
Raigad - जगाच्या इतिहासात इ.स. १९१४ ते १९१८ या दरम्यान झालेले पहिले महायुद्ध खूप प्रभावशाली ठरले. त्या काळात लाखो भारतीयांनी ब्रिटिशांकडून युद्धात सहभागी होताना पराक्रमाची शर्थ केली होती. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील पाटणूस या छोट्याशा गावातील काही सैनिक या युद्धात सहभागी झाले होते.
त्यातील ४५ जणांना वीरमरण आल्याने ब्रिटिशांनी त्यांच्या स्मरणार्थ गावात त्या काळी उभारलेल्या स्मृतिस्तंभाने गावाला वीरयोद्ध्यांचे गाव अशी वेगळी ओळख दिली आहे.
पहिले महायुद्ध हे जागतिक युद्ध होते. या युद्धात युरोपातील दोस्त राष्ट्रे (फ्रान्स, रशियन साम्राज्य, युके/ब्रिटन व इटली आणि अमेरिकेची संस्थाने) व केंद्रवर्ती सत्ता (ऑस्ट्रीया-हंगेरी, प्रशिया/जर्मनी, बल्गेरिया, ओस्मानी साम्राज्य) हे सहभागी झाले होते. यात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला; पण लाखो लोकांचा नरसंहार झाला.
यावेळी युरोपसह, आशिया, आफ्रिका, अमेरिका खंडातील तसेच प्रशांत महासागरात लढलेल्या युद्धात भारतातील दीड लाखांहून अधिक प्रशिक्षित जवानांनी लाखो व्हॉलेंटिअर/स्वयंसेवक ब्रिटिशांच्या बाजूने सहभाग घेतला होता. या युद्धामध्ये ७४ हजार १८७ भारतीय जवान शहीद झाले; तर ६७ हजारहून अधिक भारतीय जखमी झाले होते.
स्वातंत्र्यदिनी मानवंदनेची परंपरा
शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटणूस गावकऱ्यांसह सरपंच व ग्रामपंचायतीमार्फत १५ ऑगस्ट तसेच २६ जानेवारीला स्मृतिस्तंभ सजवून त्याला मानवंदना दिली जाते. या शहीद तसेच स्मृतिस्तंभाची दखल ग्रामपंचायतीकडून घेतली जाते.
स्मृतिस्तंभाच्या भोवती सुशोभीकरण करण्यात आले आहे. पाटणूस ग्रामपंचायत व कुंडलिका विद्यालयाच्या परिसरामध्ये हा स्मृतिस्तंभ आहे. त्यावर पांढऱ्या संगमरवरावर इंग्रजीमध्ये स्पष्टपणे ४५ जणांच्या बलिदानाबद्दलचा उल्लेख करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.