

Social Media Flooded with Local Election Aspirants in Raigad
Sakal
पाली : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर व्हायच्या आहेत. मात्र असंख्य इच्छुक उमेदवारांनी यासाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. अनेकांनी थेट समाज माध्यमांवर आपणच इच्छुक उमेदवार असल्याचे जाहीर देखील केले आहे. शिवाय रोजच्या रोज या संदर्भात आपल्या कामांच्या पोस्ट, तसेच विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. समाज माध्यमांवर अशा इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी पहायला मिळत आहे.