

Kitchen Gardens Flourish in Raigad ZP Schools
Sakal
पाली : सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांतील परसबाग बहरल्या आहेत. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण अंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुधागड तालुक्यातील सर्वच शाळांनी आपला सहभाग नोंदवला. पाच्छापूर, सागवाडी व तिवरे जिल्हा परिषद शाळांनी सुयश मिळवले असून या शाळांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.