esakal | गोव्यातील रेल्वेचे 5 मार्ग वळवले; वेळापत्रकावर होणार परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

गोव्यातील रेल्वेचे 5 मार्ग वळवले; वेळापत्रकावर होणार परिणाम

गोव्यातील रेल्वेचे 5 मार्ग वळवले; वेळापत्रकावर होणार परिणाम

sakal_logo
By
राजेश कळंबटे/

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर (Konkan railway) थिविम -करमळी (Thivim-karmali) दरम्यान असलेल्या ओल्ड गोवा बोगद्यात चिखल, माती रेल्वेरुळावर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाच गाड्यांचे मार्ग वळवण्यात आला असून पाच गाड्यातील प्रवाशांना ट्रान्सपर करण्यात आले आहे. मडगावकडे जाणार्‍या सर्वच गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे सलग चौथ्या दिवशी कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. तसेच कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेस रद्द केली आहे.(railway-lines-diverted-in-goa-trapped-passengers-old-goa-tunnel-ratnagiri-akb84)

चार दिवसांपुर्वी दक्षिण रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती. त्यानंतर दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तिन दिवस कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते.आता चौथ्या दिवशी ओल्ड गोवा टनेलमध्ये दरड कोसळल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. गेले आठ दिवस कोकण विभागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचा परिणाम रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी होऊ लागला आहे.

हेही वाचा: कोल्हापुरात सनईच्या सुरात व्यापाऱ्यात जल्लोष; मिळणार डिस्काऊंट

दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाश्यांचेही हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे गाड्यांचं वेळापत्रक खोळंबलं आहे. काही गाड्या या वेगळ्या मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत. रुळांवरील पाणी आणि दरड बाजूला करण्याचं काम सुरू असून रेल्वे केव्हा पूर्वपदावर येणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.

गोवा बोगद्यात कोसळलेल्या दरडीचा प्रकार सोमवारी (ता. 19) सकाळी घडला. त्यामुळे नेत्रावती एक्स्प्रेस थिविम स्थानकात, पेडणे येथे वास्को एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस कुडाळला थांबवून ठेवण्यात आली आहे. रुळावरील माती काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे. सकाळपासून कर्नाटक-केरळकडे जाणारी सर्वच वाहतूक ठप्प झाली आहे.

loading image