esakal | कोल्हापुरात सनईच्या सुरात व्यापाऱ्यात जल्लोष; लस घेतलेल्यांसाठी मिळणार डिस्काऊंट
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात सनईच्या सुरात व्यापाऱ्यात जल्लोष; मिळणार डिस्काऊंट

कोल्हापुरात सनईच्या सुरात व्यापाऱ्यात जल्लोष; मिळणार डिस्काऊंट

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

कोल्हापूर : कोल्हापूरचा (Kolhapur) तब्बल तीन महिन्यांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील दुकानांचे शटर सनई चौघड्यांच्या सुरात उघडण्यात आले. बैलगाडीसह राजारामपुरी मुख्य मार्गावर मिरवणूक काढून मास्क वापरण्याचे आवाहन ही करण्यात आले. ज्यांचे दोन डोस झाले आहेत, त्यांना खरेदीवर डिस्काऊंट देण्याचा निर्णय या मिरवणुकीत जाहीर करण्यात आला. कोल्हापुरातील सर्व दुकानदारांनी कामगरांची टेस्ट आणि लसीकरण करण्यात ही पुढाकार घेण्यार असल्याची माहिती राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललीत गांधी यानी दिली. (kolhapur-all-shop-open-update-kolhapur-lockdown-trending-news-akb84)

जिल्ह्यात तीन महिने लाॅकडाऊन असताना शहरातील पाॅझिटीव्ही दर स्वतंत्र काढून केवळ एका आठवड्यासाठी दुकाने सुरू झाली होती. मात्र तो दर पुन्हा वाढवल्यामुळे पुन्हा शटर डाऊन झाले होते. यामुळे व्यापारी आक्रमक झाले. शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्तेचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर सद्या पाॅझिटीव्ही दर दहा टक्क्यांनी कमी आल्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी सकाळी सात ते दुपारी चार दरम्यान दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याचा आनंद आज व्यापाऱ्यांनी जल्लोष करून व्यक्त केला.

हेही वाचा: परितेत गर्भलिंग निदान केंद्रावर छापा; एका महिलेसह चौघे ताब्यात

पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्यामुळे सर्व दुकाने आज पासून सुरू होत आहेत. त्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे . सकाळी 7 ते दुपारी 4 या कालावधीतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्यामुळे आज सकाळी सकाळी पुन्हा एकदा दुकान उघडण्याची लगबग कोल्हापुरातील व्यापारी पेठांमध्ये दिसत आहे.

गेल्या आठ दिवसांत हा पॉझिटिव्हीटी रेट ९.१२ टक्के आला. त्यामुळे सोमवारपासून (ता. १९) जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सोशल डिस्टन्सिंग पाळून दुकाने सुरू झाली आहेत.

loading image