'त्या' प्रवाशांचा शोध सुरू.... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

 रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सय्यद उमर फारूक वय 75 हे ग्रहस्थ कोरोना पॉझिटिव्ह होते ते 18 मार्चला मुंबई ते मंगलोर प्रवास करत असताना s3 बोगीमध्ये 49 या असणार वरून प्रवास करत होते त्यांच्या लगत बसलेले 13 प्रवासी  रत्नागिरी उतरले होते.

कणकवली - मुंबई ते मंगलोर असा प्रवास करत असणाऱ्या एका 75 वर्षीय प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह होता असे निदर्शनास आले आहे. या प्रवाशाने मुंबई ते बेंगलोर या रेल्वेगाडीच्या s3 बोगीतून 18 मार्चला प्रवास केला होता. यातील सोबतच्या आसनावरील 13 प्रवासी रत्नागिरीचे तर सात प्रवासी  कणकवली रेल्वे स्थानकात उतरले होते. विशेष म्हणजे त्या प्रवाशाच्या लगतचे 50 आणि 51 आसनावर बसलेल्या दोन प्रवाशांना सोधण्यासाठी रेल्वे आणि स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आहे. याबाबत रेल्वेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला माहिती कळविण्यात आली आहे सध्या ही माहिती व्हाट्सअॅप वरती मोठ्या प्रमाणात वायरल होऊ लागली आहे.

वाचा - गर्दी टाळण्यासाठी देवरुखने लढवली अशी युक्ती...

 रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सय्यद उमर फारूक वय 75 हे ग्रहस्थ कोरोना पॉझिटिव्ह होते ते 18 मार्चला मुंबई ते मंगलोर प्रवास करत असताना s3 बोगीमध्ये 49 या असणार वरून प्रवास करत होते त्यांच्या लगत बसलेले 13 प्रवासी  रत्नागिरी उतरले होते. तर सात प्रवासी कणकवली रेल्वे स्थानकात 19 मार्चला सकाळी उतरले. 

या सर्व प्रवाशांची नावे, मोबाईल नंबर रेल्वेने प्रसिद्ध केले आहेत. काही प्रवाशांची संपर्क झालेला आहे अशा प्रवाशांना तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. त्यानुसार आता स्थानिक प्रशासनाने संबंधित प्रवाशांचा शोध सुरू केला आहे. रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या यादी नुसार नावांची शोधाशोध सुरू झाली आहे. मात्र ही नावे अर्धवट आहेत. काही मोबाईल नंबरही लागत नाही त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Railways and the local administration kankavli are trying to reach out to passengers