esakal | देवरुखात दसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

rain in devrukh ratnagiri at evening on 4 pm it problematic to kokan people at this time

साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जाणारा दसरा सण किमान साजरा केला जाईल अशी अपेक्षा होती मात्र कोरोनासह पावसाने ती फोल ठरवली आहे.

देवरुखात दसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

साडवली : देवरुखवासियांना आज दसऱ्याच्या दिवशी सोने लुटायच्या ऐवजी मुसळधार पावसाचे दर्शन झाले. सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या मुसळधार पावसाने झोडपुन काढले. काही वेळासाठी पडलेल्या पावसामुळे परिसरात पाणी पाणी झाले. बाजारपेठ परिसरात अनेकांची यामुळे धांदल उडाली. जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे काही काळासाठी लोकांनी बसस्टॉप संबधित दुकाने यांचा आधार घेतला. 

हेही वाचा - चालक कम बॉडीगार्ड अशा दुहेरी भूमिकेतील डेअरिंगबाज सारथी लतिका -

कोरोनामुळे नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. मंदिरे बंद आहेत. अनेकांना गरबा, रास दांडीया असे पारंपारिक खेळ खेळता आले नाहीत. साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जाणारा दसरा सण किमान साजरा केला जाईल अशी अपेक्षा होती मात्र कोरोनासह पावसाने ती फोल ठरवली आहे. यासह शासनाच्या नियमांचे उल्लंघन केलेल्यांना दंडही झाला.

हेही वाचा -  कोकण व्हाया दुबई ; कोकणची कृषीकन्या झाली लखपती -

कोरोनामुळे आर्थिक मंदीचे वातावरण पसरले आहे. यातच भर म्हणून आज सणाच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर आलेल्या लोकांचा पावसामुळे हिरमोड झाला.   परिणामी दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, सोने - चांदीचे दागिने, नवीन वास्तु यांची खरेदीच न झाल्याने कोट्यावधीची होणारी उलाढाल थांबल्याने व्यापारी वर्गही हैराण झाला आहे. 

संपादन - स्नेहल कदम