संगमेश्वर तालुक्यात पावसाच्या सरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

संगमेश्वर - येणार येणार याकडे डोळे लावून बसलेल्या पावसाने आज अखेर संगमेश्वर तालुक्यात हजेरी लावली. तालुक्याच्या पूर्वेकडील गावांमध्ये संध्याकाळी तासभर दमदार पाऊस कोसळला.आज सकाळपासून मळभी वातावरण होते. गेले चार दिवस हाच प्रकार सुरु आहे. मात्र पाऊस केवळ हुलकावणी देवून जात होता. आज मात्र पावसाने सर्वाना सुखद धक्का दिला. 

संगमेश्वर - येणार येणार याकडे डोळे लावून बसलेल्या पावसाने आज अखेर संगमेश्वर तालुक्यात हजेरी लावली. तालुक्याच्या पूर्वेकडील गावांमध्ये संध्याकाळी तासभर दमदार पाऊस कोसळला.
आज सकाळपासून मळभी वातावरण होते. गेले चार दिवस हाच प्रकार सुरु आहे. मात्र पाऊस केवळ हुलकावणी देवून जात होता. आज मात्र पावसाने सर्वाना सुखद धक्का दिला. 

दुपारी तीन नंतर तालुक्यातील कसबा, फणसवणे, नायरी, कारभाटले, अणदेरि, तुरळ, धामणी, गोळवली, कुंभारखाणी, आरवली, कडवई आदी गावांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला.
ढगांचा कडकडाट करत मुसळधार पाऊस पडल्याने दिवसभर वाढलेला हवेतला उष्मा अचानक कमी झाला. आजच्या पावसामुळे काही काळ थंड वातावरणाचा अनुभव सर्वांना घेता आला.

तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हलकासा शिडकावा केला. संगमेश्वर परिसरात संध्याकाळी चारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ढगांच्या गडगडाटामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rains in Sangmeshwar Taluka

टॅग्स