राजन तेली यांनी केली शिवसेनेवर 'ही' टीका

Rajan Teli Criticism On Shiv Sena Sindhudurg Marathi News
Rajan Teli Criticism On Shiv Sena Sindhudurg Marathi News

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - राज्यात सत्तेत असलेले शिवसेनेचे सरकार एकीकडे राजकारण करीत असताना भाजप पक्षाने कोरोना अंतर्गत सेवा अविरतपणे सुरु ठेवली आहे. एकीकडे भाजप पक्ष आपत्कालीन परिस्थितीतही मदतीसाठी पुढे सरसावत आहे तर सत्तेतील शिवसेना पक्षाने फक्त घोषणा आणि कोरोना रूग्णांच्या आकडेवारीची सवय नागरीकांना केली आहे, अशी टीका भाजपचे सरचिटणीस राजन तेली यांनी केली. 

भाजपच्यावतीने शहरात आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपाचा प्रारंभ येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाला. यावेळी श्री. तेली बोलत होते. नगराध्यक्ष संजू परब, सभापती मानसी धुरी, भाजप तालुकाध्यक्ष संदीप गावडे, महेश सारंग, नगरसेवक मनोज नाईक, आरोग्य सभापती ऍड. परिमल नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, राजू बेग, उदय नाईक, नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, दिपाली भालेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य निशांत तोरसकर, परिणिती वर्तक, संदीप धुरी, केतन आजगावकर आदी उपस्थित होते. 

श्री. तेली म्हणाले, ""सिंधुदुर्ग भाजपकडून कोरोना काळात रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यास उपयुक्त ठरणाऱ्या आर्सेनिक अल्बम 30 या गाळंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर देशातील मोदी सरकारने निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. पक्षाने तर मास्क सॅनिटायझर, जीवनावश्‍यक वस्तू, आर्सेनिक अल्बम यांचे वाटप केले. ठिकठिकाणी कमळ थाळीचा प्रारंभही केला.'' 

ते म्हणाले, ""सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार नितेश राणे यांनी सर्वात प्रथम 1 हजार पीपीई किट डॉक्‍टरांना वाटले होते. सव्वा लाखाच्यावर मास्क वाटपही झाले आहे. येथील पालकमंत्री टेंडर दिले आहे अशी घोषणा करीत राहिले; मात्र भाजपने घराघरात मदत पोहोचविली. या सर्व मदतीची माहिती केंद्रीय कृषीमंत्री वारंवार व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेत आहेत. सिंधुदुर्गात सुसज्ज लॅब नाही. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्या 77 लाख रुपयांची टेस्टिंग लॅब आणली होती; मात्र त्याला आवश्‍यक ती मशिनरी देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. शेजारच्या गोवा राज्याने तातडीने कोविड टेस्ट लॅब उपलब्ध करुन दिली आहे; मात्र राज्य सरकार कोरोना काळात सपशेल अपयशी ठरले. स्थानिक आमदार गेली चार महिने गायब आहेत तर त्यांच्याच पक्षात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेवरुन कुरघोड्या सुरु आहेत. कोरोना परिस्थितीतही शिवसेनेला राजकारण सुचत आहे.'' 

नगराध्यक्ष परब म्हणाले, मोदी सरकारने कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी योग्य नियोजन, दक्षता व उपाययोजना केल्या आहेत. तुम्ही जगा व दुसऱ्याला पण जगवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानुसार भाजप पक्षाचे कामकाज सुरु आहे. कोरोनाला हरविण्यासाठी ठिकठिकाणी सहकार्याचे काम होत आहे. माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत वेगवेगळ प्रकारची मदत जनतेला उपलब्ध करुन दिली आहे.'' नगराध्यक्ष परब व सर्व नगरसेवक यांच्याकडे शहराकरिता सव्वा लाख आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या वाटपाकरिता पक्षाच्यावतीने सुपूर्द करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com