पोलिसांची भाजपविरोधात दडपशाही सुरुये; राजन तेलींचा हल्लाबोल

भाजपला केवळ टार्गेट करीत असाल तर सहन केले जाणार नाही.
rajan teli
rajan teliesakal

ओरोस - आमदार नितेश राणे यांना ६ फेब्रुवारीपर्यंत दिलासा असताना जिल्हा न्यायालयाबाहेर बाहेर (Sindhudurg District Court) त्यांना अडवून पोलिसांनी गुन्हा केला होता; मात्र पोलिसांनी उलट निलेश राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात पोलिसांची भाजप (BJP) विरोधात दडपशाही सुरू झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कोणाच्यातरी दबावाखाली येऊन भाजप विरोधात वागत आहेत; मात्र आम्ही हे सहन करणार नाही. येत्या दोन दिवसांत जिल्हा कार्यकारिणी बैठक घेऊन या विरोधात आंदोलन करण्याची दिशा ठरवणार आहोत, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हा न्यायालयाबाहेर १ जानेवारीला घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष तेली व शिष्टमंडळ आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना भेटले. यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आ अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना कुबल, बाबली वायंगणकर, दोडामार्ग नगरसेवक चेतन चव्हाण, सुहास गवंडळकर आदी उपस्थित होते.

rajan teli
गोवा कनेक्शन? कणकवली पोलिस नितेश राणेंना घेऊन रवाना?

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्यानंतर तेली यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी ते म्हणाले, 'जिल्ह्यात पोलिसांची भाजप विरोधात दडपशाही सुरू झाली आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. तसा तो सर्वांनी केला पाहिजे. पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे; परंतु पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ता येईल आणि जाईल; परंतु आम्ही असा अन्याय कधीच सहन करणार नाही. जिल्हा न्यायालयाच्या बाहेर पोलिसांनी आमदार नितेश राणे यांची गाडी अडवली. सुरुवातीला माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) गप्प होते. १० मिनिटानंतर त्यांनी पोलिसांना विचारले 'गाडी का अडवली. तुमच्या जवळ आदेश आहेत का?' यावर पोलिसांनी उत्तर दिले वरिष्ठांना विचारतो. जर सर्वोच्च न्यायालयाने ६ फेब्रुवारीपर्यंत अभय दिला होता, जिल्हा न्यायालयाने आमदार राणे यांनी केलेला अर्ज अधिकृत नव्हता, असे सांगितले असताना त्यांना अटक करण्याचा प्रश्न आला कुठे? त्यावेळी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मोडला; परंतु कोरोना निर्बंध मोडले म्हणून भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले."

ते म्हणाले, ही घटना आम्ही जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. परिवर्तन यात्रे दरम्यान कुडाळच्या आमदारांनी पोलिस निरीक्षक कोरे यांना धक्काबुक्की केली, त्यांच्यावर गुन्हा नाही. आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) मतदार संघात भूमिपूजने करत सुटले आहेत. त्यांना हा नियम लागू नाही. याचाच अर्थ पोलिस दुजाभाव करत आहेत. आज आम्ही पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट मागितली होती; परंतु त्यांनी साधे कळविले सुद्धा नाही. याचा अर्थ पोलीस व प्रशासन कोणाच्यातरी सांगण्यावरून काम करत आहेत. पोलिस अधीक्षक दबावात आहेत. कायदा सर्वाना समान आहे. कायद्यात असेल ते जरूर करा; परंतु भाजपला केवळ टार्गेट करीत असाल तर सहन केले जाणार नाही. पोलिसांनीच गुन्हा केल्याचा आरोप यावेळी माजी आमदार अजित गोगटे यांनी जिल्हा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला.

rajan teli
नितेश राणे तुरुंगात पुस्तक वाचून वेळ घालवतायत? फोटो होतोय व्हायरलं

जिल्ह्याचे पोलिस आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक करण्यासाठी आतुर होते. त्यामुळे आमदार राणे यांना ६ जानेवारीपर्यंत दिलेला दिलासा पोलिस विसरले. जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारले असे समजताच आमदार राणे यांना अटक करण्यासाठी त्यांची गाडी अडविली. आमदार राणे यांनी गाडी अडवून पोलिसांनीच गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर वाट अडवली म्हणून गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याचा विचार आम्ही करत आहोत; मात्र कायदा स्वतः मोडलेला असताना पोलिसांनी निलेश राणे व कार्यकर्ता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याचाच अर्थ भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिस सापत्नभावाची वागणूक देत आहेत; परंतु भाजप आता गप्प बसणार नाही. पोलिसांच्या दडपशाही विरोधात आंदोलन उभे करणार, असा इशारा दिला.

पूर्ण भाजप राणेंच्या पाठिशी

आमदार नितेश राणे यांना चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आले आहे. त्यानंतर निलेश राणे व कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व भाजप नितेश राणे यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. भाजप विरोधात शासन व पोलीस यंत्रणा वापरली जात आहे; मात्र यावर भाजप प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहणार नाही. त्याची भूमिका लवकरच ठरवून आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिला आहे.

rajan teli
अमित शहांच उदाहरण देणं आलं अंगलट; नितेश राणेंनी 'ते' ट्वीट केलं डिलीट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com