Rewas-Reddi Coastal Highway : कोकण पर्यटनाला वाहतूक कोंडीचा मोठा फटका! 'या' मार्गावरून जाताना घ्या काळजी, अरुंद रस्त्यामुळे प्रवाशांसह भाविकांचे हाल

Rajapur Adivare road widening demand : राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे रेवस-रेड्डी सागरी महामार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे पर्यटक, भाविक आणि स्थानिक प्रवाशांसाठी रस्ता रुंदीकरण किंवा बायपासची मागणी होत आहे.
Rewas Reddi coastal highway traffic congestion

Rewas Reddi coastal highway traffic congestion

esakal

Updated on: 

राजापूर : कोकणच्या किनारपट्टीवरील रेवस-रेड्डी सागरी महामार्गावर गेल्या काही वर्षांत वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’ म्हणून पर्यटकांची विशेष पसंती लाभलेल्या राजापूर तालुक्यातील आडिवरे परिसरात रस्ता अरुंद असल्याने सतत वाहतूक कोंडी होत (Rewas Reddi coastal highway traffic congestion) आहे. याचा फटका पर्यटक, भाविक आणि स्थानिक प्रवाशांना बसत असून, यावर मात करण्यासाठी आडिवरे परिसरात रस्ता रुंदीकरण किंवा पर्यायी ‘बायपास’ मार्ग उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Loading content, please wait...