शेतकऱ्यांनो पासबुकाची झेरॉक्‍स दया नाहीतर.....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

क्‍यार वादळातील भातशेती नुकसान झाले मात्र शेतकऱ्यांनी अद्यापही प्रशासनाकडे बॅंक खाते पासबुकाची झेरॉक्‍स जमा केली नसल्याने हे घडले...

राजापूर (रत्नागिरी) : क्‍यार वादळामुळे झालेल्या अवकाळी पावसामध्ये भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून कमी मिळाल्याची बोंब शेतकऱ्यांकडून मारली जात आहे. मात्र, त्याचवेळी नुकसानभरपाईचे अनुदान बॅंक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी सुमारे सातशे शेतकऱ्यांनी बॅंक पासबुकाची झेरॉक्‍स दिली नसल्याची बाब पुढे आली आहे. 

हेही वाचा- पर्यटनमंत्री आदिती तटकरे आणणार ; मंडणगड किल्ल्याला साेनेरी दिवस...

ऑक्‍टोंबर महिन्यामध्ये क्‍यार वादळ झाले. याचा फटका तालुक्‍यातील भातशेतीला बसून भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये तालुक्‍यातील 237 गावांमधील 1 हजार 854.52 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. त्याचा 9 हजार शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामध्ये 1 कोटी 89 लाख 60 हजार 900 रुपयांचे नुकसान झाले. याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागातर्फे शासनाला सादर करण्यात आला होता. 

हेही वाचा- रत्नागिरीत शिवसेनेची मतांना का लागली गळती...? 

शेतकऱ्यांची भरपाई त्यांच्या खात्यात 
त्याची दखल घेवून शासनातर्फे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. तालुक्‍याला 1 कोटी 89 लाख 60 हजार 900 रुपयांचे अनुदान प्राप्त झालेत. महसूल विभागातर्फे वितरण सुरू झाले आहे. मात्र, नुकसानग्रस्त सुमारे सातशे शेतकऱ्यांनी अद्यापही प्रशासनाकडे बॅंक खाते पासबुकाची झेरॉक्‍स जमा केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची भरपाई त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajapur Farmer Not Submitted Bank Passbok In Banks Ratnagiri Marathi News