esakal | राजापूरच्या गंगा स्नानाची पर्वणी यंदाही नाहीच; दोन्ही द्वार बंद

बोलून बातमी शोधा

राजापूरच्या गंगा स्नानाची पर्वणी यंदाही नाहीच; दोन्ही द्वार बंद
राजापूरच्या गंगा स्नानाची पर्वणी यंदाही नाहीच; दोन्ही द्वार बंद
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : जगभरामध्ये कोरोना महामारीने थैमान घातलेले असताना उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाईचे (Ganga Rajapur) आगमन झाले आहे. मात्र कोरोनामुळे या ठिकाणी स्नान करण्यास मनाई केली आहे. गंगा देवस्थानकडून गंगा तीर्थक्षेत्री जाणारे दोन्ही बाजूचे मार्ग (Road) बंद केले आहे. भाविकांची गंगामाईच्या पवित्र स्नानाची पर्वणी हुकली आहे.

गतवर्षी कोरोना (Covid-19) महामारीच्या कालावधीमध्ये गंगामाईचे गंगास्थानी आगमन झाले होते. त्या कालावधीमध्ये कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे गंगास्नानाला मनाई करण्यात आल्याने अनेक भाविक गंगास्नानाला मुकले होते. गतवर्षीच्या गंगास्नानाला वर्षपूर्ती होत असताना पुन्हा एकदा गंगामाईचे आगमन झाले आहे.

हेही वाचा: सह्याद्रीच्या रांगातील वाघ दृश्‍य की अदृश्‍य?

गतवर्षी कोरोना महामारीची जशी स्थिती होती तशीच स्थिती यावर्षीही राहिली आहे. गंगामाईचे स्नानाला पवित्र स्नान मानले जात असून या स्नानाची पर्वणी साधण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक उन्हाळे तीर्थक्षेत्री गंमामाईच्या वास्तव्याच्या काळात येतात. त्यामुळे यावर्षीही गत आठवड्यात आगमन झालेल्या गंगामाईच्या स्नानासाठी भाविक येण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

गंगातीर्थक्षेत्री भाविकांनी गर्दी केल्यास सोशल डिस्टन्स न पाळल्यास त्यातून संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून गंगा देवस्थानाकडून गंगा स्नान करण्यास भाविकांना मनाई केली आहे. भाविकांनी या ठिकाणी येऊ नये वा चुकून आल्यास त्यांनी प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करू नये, यादृष्टीने गंगा देवस्थानाकडून गंगा तीर्थक्षेत्री असलेली दोन्ही प्रवशद्वारे बंद केली आहे. त्यामुळे भाविकांना त्या ठिकाणी स्नानाला जाण्यास अटकाव होणार आहे.