

Kokan
esakal
राजेंद्र बाईत
राजापूर: कोकणाची ओळख असलेल्या हापूस आंबा आणि काजू पिकाला हवामान बदलाचा मोठा फटका बसत आहे. पर्याय म्हणून अनेक शेतकरी शाश्वत उत्पन्नासाठी सुपारी बागायतीकडे वळले होते; मात्र आता सुपारी आणि नारळ पिकाची स्थितीही बिकट झाली असून उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आंबा-काजू पिकाप्रमाणेच सुपारी आणि नारळ पिकालाही पीक विमा संरक्षण मिळावे, असा महत्त्वपूर्ण ठराव राजापूर पंचायत समितीच्या आढावा बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.