

Rajapur development 1876
sakal
राजापूर : राजापूरच्या शहरी विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे १८७६ साली झालेली नगरपालिकेची (म्युनिसिपालिटी) स्थापना. या स्थापनेमुळे शहराच्या विकासाला औपचारिक आणि संघटित दिशा मिळाली. रस्ते, स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक व्यवस्थापन या सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने विकसित करण्यात आल्या.