esakal | भाजपच्या तालुकाध्यक्षांनी रिफायनरीवरून साधला खासदार राऊतांवर निशाना
sakal

बोलून बातमी शोधा

Rajapur Taluka President Abhijeet Gurav Comment On MP Vinayak Raut

राजापूर तालुक्‍यात नाणार व परिसरात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला आता समर्थन वाढू लागले आहे. स्थानिक शेतकरी, बागायतदार, जमिन मालक यांसह स्थानिक शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनीही या प्रकल्पाचे उघड समर्थन केले आहे.

भाजपच्या तालुकाध्यक्षांनी रिफायनरीवरून साधला खासदार राऊतांवर निशाना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - खासदार म्हणून मतदारसंघातील विकासाबरोबरच बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात खासदार राऊत अपशयी ठरले आहेत. रत्नागिरी ग्रीान रिफायनरी प्रकल्प गुहागरला जाणार असेल तर आपण पाठपुरावा करायला तयार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रदूषणकारी प्रकल्प असल्याने रिफायनरीला विरोध करणाऱ्या राऊतांची या प्रकल्पाबाबतची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केला आहे. 

राजापूर तालुक्‍यात नाणार व परिसरात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला आता समर्थन वाढू लागले आहे. स्थानिक शेतकरी, बागायतदार, जमिन मालक यांसह स्थानिक शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनीही या प्रकल्पाचे उघड समर्थन केले आहे. राजापूर तालुका व्यापारी संघ, बार असोशिएशन, वाहतुकदार संघटना यासह अनेक संघटनांनी या प्रकल्पाला पाठिंबा जाहीर करत हा प्रकल्प झालाच पाहिजे, अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे हित डोळ्यासमोर ठेवत स्थानिक जनतेला जर हा प्रकल्प हवा असेल तर त्याबाबत निश्‍चितच विचार केला जाईल, असे एका मुलाखतीत स्पष्ट केल्याने प्रकल्प उभारणीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिवसेनेतूनही या प्रकल्पाचे समर्थन वाढू लागल्याने खासदार राऊत सैरभर झाले आहेत, असा आरोप गुरव यांनी केला. 

गुहागरात स्थानिक जनता अनुकूल असेल व कंपनी तयार असेल तर आपण हा प्रकल्प गुहागरात व्हावा यासाठी पाठपुरावा करू असे राऊत सांगत आहेत. राऊत यांचे हे विधान म्हणजे बुडत्याचा पाय अधिक खोलात असेच आहे. हा प्रकल्प राजापूरातुन गुहागरला न्यायचा प्रयत्न केलात तर इथले बेरोजगार तुम्हाला आणि शिवसेनेला बुडविल्याशिवाय रहाणार नाहीत, असा इशारा गुरव यांनी दिला आहे. 

प्रारंभी स्थानिकांचा विरोध, मग शिवसेनेचा विरोध. आता भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने विरोध, अशा क्‍लुप्त्या खासदार राऊत लढवत आहेत. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणाऱ्या प्रकल्पाला भूकंपप्रवण क्षेत्राचा धोका असू शकतो काय, कंपनी त्याबाबत योग्य खबरादारी घेईल की नाही याचा अभ्यास राऊत यांनी करणे आवश्‍यक आहे. 
- अभिजित गुरव 

loading image