Ratnagiri : राजापूरचा आराखडा ७४ कोटी ९२ लाखांचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajapur

राजापूरचा आराखडा ७४ कोटी ९२ लाखांचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : ‘घरोघरी नळ संयोजन’ देणाऱ्‍या शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तालुक्याचा सुमारे ७४ कोटी ९२ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यात जुन्या योजनांच्या दुरुस्तीच्या १०९, तर नव्या पाणीपुरवठ्याच्या ९८ अशा तब्बल २०७ पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे.

मुबलक प्रमाणात पाऊस आणि दरवर्षी पाणीटंचाई दूर करण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही तालुक्यातील अनेक गावे अद्यापही तहानलेली आहेत. अशा स्थितीमध्ये तालुक्याची कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्याच्या अनुषंगाने जलजीवन मिशन योजनेच्या आराखड्याची अंमलबजावणी महत्वपूर्ण ठरणार आहे.

या महत्वाकांक्षी योजनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला किमान प्रतिदिन ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देताना घरोघरी नळसंयोजन देण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. ९८ नवीन योजनांसाठी सुमारे ५३ कोटी ४३ लाख रुपये तर सुधारात्मक पुनर्जोडणीच्या १०९ योजनांसाठी सुमारे २१ कोटी ४९ लाख ११ रुपये निधी अपेक्षित आहे.

निधीची उभारणी वा मंजुरी आव्हानात्मक

तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी लाखोंचा खर्च केला जातो. त्यामुळे टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी जलजीवन मिशन योजना महत्वपूर्ण ठरणार आहे; मात्र, या योजनेसाठी निधीची उभारणी करणे वा शासनाकडून त्याची मंजुरी मिळवणे आव्हानात्मक ठरणार आहे.

loading image
go to top