मालवण : राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा १०० वर्षे टिकेल असाच बनविला आहे. यामुळे शिवपुतळा आणि चबुतरा याला कोणत्याही प्रकारचा धोका संभवणार नाही, याची आम्हाला आणि राज्य शासनालाही खात्री आहे. मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या परिसरातील भरावाची माती काही प्रमाणात खचल्याचा प्रकार घडला आहे. हे गंभीर नाही. तरीही घटनेची चौकशी समितीमार्फत केली जाईल. त्यांनतर आवश्यकता असल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करू, असे बांधकाम विभागाचे कोकण प्रादेशिक मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी येथे स्पष्ट केले.