Sindhudurg : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दीड महिन्यापूर्वी अनावरण, राजकोट किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा बंद; कारण आलं समोर

Rajkot Fort Closed for Tourist : समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण गेल्या महिन्यातच करण्यात आले होते. मात्र आता हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
Rajkot Fort Closed for Tourist
Rajkot Fort Closed for TouristEsakal
Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पुन्हा नवा पुतळा तयार करून बसवण्यात आलेला राजकोट किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये राजकोट किल्ला असून आता तो पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण गेल्या महिन्यातच करण्यात आले होते. मात्र या पुतळ्याच्या चौथऱ्याच्या बाजूची जमीन खचल्याचा प्रकार समोर आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com