esakal | आम्ही नाटकं सादर केली, पण आमच्या पैशाचं काय ?
sakal

बोलून बातमी शोधा

rajya natya competition in ratnagiri but the award amount not received by actors

पदरमोड करून, प्रसंगी कर्ज काढून स्पर्धेत नाट्य संस्थांनी नाटक उभे केले.

आम्ही नाटकं सादर केली, पण आमच्या पैशाचं काय ?

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : गतवर्षी हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील २२ संघांची नाटके सादर झाली. या नाट्य संस्थांना प्रत्येकी पाच हजार रुपये निर्मितीखर्चासह विजेत्या प्रथमसाठी ४० हजार रुपये, द्वितीयसाठी ३० हजार आणि तृतीयसाठी २० हजार रुपये रकमेसह वैयक्तिक पारितोषिकांची अशी सुमारे अडीच लाखांची रक्कम शासनाकडेच अडकली आहे. पदरमोड करून, प्रसंगी कर्ज काढून स्पर्धेत नाट्य संस्थांनी नाटक उभे केले. ही रक्कम कोरोना महामारीच्या काळात मिळणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा - कोकणचा पुन्हा सन्मान ; शिवसेना पक्ष प्रवक्तेपदी उदय सामंत यांची निवड

रत्नागिरीमध्ये ११ आणि मालवण, सिंधुदुर्ग येथे गतवर्षी नोव्हेंबरमध्ये स्पर्धा झाली. स्थानिक संघांना प्रवासखर्च दिला जात नाही; परंतु अन्य तालुक्‍यांतून येणाऱ्या संघांना तिकिटानुसार येण्या-जाण्याचा १२ कलाकार व ८ तंत्रज्ञांचा खर्च दिला जातो. तोसुद्धा मिळालेला नाही. रत्नागिरीचे स्पर्धा समन्वयक नंदू जुवेकर यांनी सांगितले की, अनेक संस्थांनी पदरमोड करून नाटक केले. मिळणारी रक्कम भले छोटी असेल; पण ती वेळेवर मिळावी. फॉर्मसोबत भरलेली अनामत रक्कम ३ हजार रुपये दिली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अनेक नाट्यसंस्थांनी पदरमोड करून हा खर्च केला; पण शासनाने खर्च अद्याप दिला नसल्याने नाट्यसंस्था व रंगकर्मी यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या गंभीर प्रश्‍नाकडे शासनाचे लक्ष जावे व खर्च, पारितोषिकांची रक्कम लवकर मिळावी, यासाठी मंत्री उदय सामंत यांना, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना नाट्य परिषदेतर्फे निवेदन देणार आहोत. त्याकरिता नाट्य संस्थांनी नाट्य परिषदेशी संपर्क साधावा.

हेही वाचा - बघा... काय निसर्गाची लहर...! तब्बल महिण्याआधीच मोहर 

स्पर्धा झालीच पाहिजे

‘अवघड जागेचं दुखणं’ या प्रथम विजेत्या नाटकाचे दिग्दर्शक ओंकार पाटील म्हणाले की, दरवर्षी नोकरी सांभाळून स्पर्धेचे नाटक करतो. त्याकरिता पगारातील पैसे साठवतो आणि उर्वरित रक्कम कर्जाच्या रूपाने उभी करतो. दिग्दर्शनासह प्रकाश योजना, वेशभूषेचेही पारितोषिक मिळाले. अंतिम फेरीच्या नाटकापर्यंत आम्हाला सुमारे दीड लाख रुपये खर्च आला. शासनाकडून अद्याप कसलीच रक्कम मिळालेली नाही. यावर्षीची स्पर्धासुद्धा उशिरा झाली तरी चालेल; पण ती होणे आवश्‍यक आहे. आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.

संपादन - स्नेहल कदम 

loading image