पाली विजवितरण कार्यालयावर मोर्चा

अमित गवळे
गुरुवार, 13 जून 2019

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यात वारंवार सुरु असलेला विजेचा लपंडाव आणि महावितरणच्या भोंगळ कारभाराला सुधागडवासीय अक्षरशः कंटाळली आहेत. गुरुवारी (ता.13) त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला त्यामुळे सुधागडवासीयांनी पालीतील विजवितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन देखील यावेळी दिले.

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यात वारंवार सुरु असलेला विजेचा लपंडाव आणि महावितरणच्या भोंगळ कारभाराला सुधागडवासीय अक्षरशः कंटाळली आहेत. गुरुवारी (ता.13) त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला त्यामुळे सुधागडवासीयांनी पालीतील विजवितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन देखील यावेळी दिले.

महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्यादीत पाली सुधागड विजवितरण प्रशासनाच्या भोंगळ व गलथान कारभाराविरोधात पाली बसस्थानक, हटाळेश्वर चौक, मुख्य बाजारपेठ ते पाली विजवितरण कार्यालयावर मोर्चा काढून विजवितरण प्रशासनाविरोधात नागरीकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. लवकर विजपुरवठा सुरळीत राहण्यासंदर्भात ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात, पावसाळ्यात विजसेवा सुरळीत रहावी अन्यथा विजवितरण कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा यावेळी संतप्त मोर्चेकर्‍यांनी दिला.

येथील विजसमस्येवर तोडगा काढण्यात महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्यादीत पाली सुधागड विजवितरण प्रशासन अपयशी ठरले आहे. विजवितरणच्या कारभारात आज ना उद्या सुधारणा होईल या अपेक्षेत असलेल्या नागरीकांचा सातत्याने भ्रमनिराश झाला आहे. नियमित खंडीत होणारा विजपुरवठा, भरमसाठ रकमेची विद्यूत देयके, अधिकारी व कर्मचार्‍यांचा ग्राहकांशी उर्मठ वागणूक तसेच विजविरण कार्यालयात विजसमस्या घेवून जाणार्‍या नागरीकांशी येथील अधिकारी, कर्मचार्‍यांची अरेरावीची भाषा व उध्दट वर्तन यामुळे नागरिक संतापले होते.  ग्राहकांशी प्रेमपुर्ण, व सौदार्हपूर्ण वागा, त्यांचा अंत पाहू नका अन्यथा कुणाचीही हयगय केली जाणार नाही अशी तंबी देखील यावेळी देण्यात आली. 

मागण्यांचे निवेदन वीजवितरण विभागाचे पालवे व पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी स्वीकारले. या मोर्चात यावेळी राजकीय सर्व पक्षिय पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी व नागरीक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत याकरिता पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rally on pali electricity