
शेवटी या बैठकीतून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी काढता पाय घेत बैठक गुंडाळली.
Kadam V/S Thackeray : कदमांच्या विरोधात बोलाल तर..; रामदास कदम, उद्धव ठाकरे समर्थकांत बाचाबाची
खेड : दापोली विधानसभा मतदार संघाच्या खेड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज भरणी नाका येथील बिसू हॉटेल येथे ठेवण्यात आली होती. ही बैठक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी बोलावली होती. या बैठकीप्रसंगी शिवसेनेचे सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (ramdas kadam and uddhav thackeray political news)
हेही वाचा: Ramdas Kadam : 'त्या' दिवसापासून आजपर्यंत मी मातोश्रीवर गेलेलो नाही - रामदास कदम
दरम्यान, बैठक सुरू झाल्यानंतर विविध विषय आणि पक्षाशी एकनिष्ठ राहणे यावर जिल्हाप्रमुख कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन सुरू केले. त्यानंतर माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. त्यामुळे बैठकीत उपस्थित कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यानंतर बैठकीतून माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांनी पळ काढला. परंतु कदम समर्थकांनी त्यांना हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच गाठून यापुढे माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या विरोधात जर बोलाल तर आम्ही खपवून घेणार नाही अशी तंबी दिली. शेवटी या बैठकीतून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी काढता पाय घेत बैठक गुंडाळली.
हेही वाचा: Ramdas Kadam : 'इथून पुढं डोळ्यांतून कधीच पाणी काढणार नाही'
Web Title: Ramdas Kadam Uddhav Thackeray Activist Disputes In Meeting Khed Ratnagiri Political News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..