Ramdas Kadam : 'इथून पुढं डोळ्यांतून कधीच पाणी काढणार नाही' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Kadam

'यापुढे कधी मी डोळ्यांतून पाणी काढणार नाही, मात्र समोरच्याच्या डोळ्यांतून नक्की पाणी काढणार'

Ramdas Kadam : 'इथून पुढं डोळ्यांतून कधीच पाणी काढणार नाही'

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रामदास कदम एका पत्रकार परिषदेत बोलताना भावनिक झाले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या डोळ्यात अश्रु पाहिले होते. दरम्यान, आज एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी इथून पुढं डोळ्यांतून कधीच पाणी काढणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुलाखतीचा शेवट त्यांनी या वाक्याने केला आहे.

हेही वाचा: शरद पवार काय करतील याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही'

रामदास कदम म्हणाले की, मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो त्यांच्याशी दोन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय झाला आता मराठा समाजाला आरक्षणात न्याय देणार का?, असा सवाल केला असता मुख्यमंत्री शिंदेंनी समाधानकारक उत्तर दिलं आहे. यानंतर गोवा-मुंबई महामार्गाचे काम पूर्ण करण्याविषयी विचारले असता, शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन ताबडतोब महामार्गाचे काम पूर्ण करु असं अश्वासन दिलं आहे. तुम्ही कोणत्या पक्षात जाणार आहात का अशी विचारणाही मी मुख्यमंत्री शिदें यांना केली असल्याचे कदमांनी सांगितले आहे.

मातोश्रीवर पुन्हा जाणार का असा सवाल केला असता कदम म्हणाले, हाकलपट्टी हा शब्द माझ्या जीवाला लागला आहे. अडीच तीन-वर्षातही मी मातोश्रीवर गेलो नाही आणि आता तिकडे परत जाणे मला कठीण वाटत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मी हट्टी नाही पण स्वाभिमानी आहे. स्वाभिमान गहाण ठेवून काही नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि संघर्षाची शिकवण दिली आहे. त्यामुळे गुडघे टेकणारा रामदास कदम नाही, अंसही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

हेही वाचा: Ramdas Kadam : भाजप सेनेसकट सगळे एकत्र आले अन् मला संपवायचा प्रयत्न झाला..

या मुलाखतीच्या शेवटी ते म्हणाले की, यापुढे मी डोळ्यांतून पाणी काढणार नाही. मात्र समोरच्याला डोळ्यांतून पाणी नक्की काढयला लागणार, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

Web Title: Ramdas Kadam Says Do Not Tears On My Eyes From Till Date Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top