राणे समर्थक असणारे `हे` राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

श्री. भोगटे यांचा योग्य सन्मान केला जाईल. पुढील 2021 मध्ये होणाऱ्या कुडाळ नगरपंचायत निवडणूकसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडी नगरपंचायत ही एकत्रित रित्या लढणार आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले. 

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - गेली कित्येक वर्षे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माजी सभापती सुनील भोगटे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते श्री. भोगटे यांचा प्रवेश झाला. श्री. भोगटे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

श्री. भोगटे यांनी नारायण राणेंसोबत शिवसेना, कॉंग्रेस, स्वाभिमान पक्ष आणि भाजप असा प्रवास केला होता. यादरम्यान श्री. भोगटे यांनी येथील पंचायत समितीचे सभापती, उपसभापती पद भूषविले होते. भोगटे यांच्या प्रवेशापाठोपाठ अजून काही राणे समर्थक हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. भोगटे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात नवे चैतन्य निर्माण झाले आहे. श्री. भोगटे यांचा योग्य सन्मान केला जाईल. पुढील 2021 मध्ये होणाऱ्या कुडाळ नगरपंचायत निवडणूकसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडी नगरपंचायत ही एकत्रित रित्या लढणार आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले. 

या प्रवेशादरम्यान श्री. सामंत यांनी श्री. भोगटे यांना जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष पद दिले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, बाळा कनयाळकर, तालुकाध्यक्ष भास्कर परब, आत्माराम ओटवणेकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संग्राम सावंत, साबा पाटकर, सावळाराम आणावकर, प्रसाद पोईपकर, अशोक कांदे, शिवाजी घोगळे या सर्वांनी सुनील भोगटे यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rane Supporter Sunil Bhogte Enters In NCP Sindhudurg Marathi News