पत्रकारांच्या प्रश्‍नांना प्राधान्य गरजेचे - रणजित देसाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

कुडाळ - ‘‘पत्रकार समाजातील सुख-दुःखात नेहमी अग्रेसर असतो. या आधुनिक युगात मोबाईलच्या वापराने घराघरात पत्रकारिता पोचली आहे. पत्रकारांच्या प्रश्‍नांना आज प्राधान्य देणे गरजेचे असून शासनाने कायदे व विविध योजना पत्रकारांसाठी अमलात आणाव्यात’’, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले. तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. 

ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, वसंत दळवी ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार ‘सकाळ’चे नंदकुमार आयरे आणि भैयासाहेब वालावलकर छायाचित्रकार पुरस्कार पत्रकार रमेश जामसंडेकर यांना प्रदान करण्यात आला. येथील बॅ. नाथ पै. शिक्षण संस्थेच्या सभागृहात सोहळा झाला. 

जिल्हा परिषद उपाध्यक्ष देसाई यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समितीचे अध्यक्ष 
गणेश जेठे होते. व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी 
मिलिंद बांदिवडेकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पालकर, जिल्हा सचिव उमेश तोरसकर, ज्येष्ठ पत्रकार वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, नंदकुमार आयरे, रमेश जामसंडेकर, प्राचार्य डॉ. व्यंकटेश भांडारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, विकास कुडाळकर, प्रा. अरुण मर्गज, वालावल सरपंच नीलेश साळसकर, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत, जयराम डिगसकर उपस्थित होते. 

पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. नूतन जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष जेठे, सचिव तोरस्कर व कुडाळ 
समिती अध्यक्ष विजय पालकर यांचा व गुणवंत पत्रकार म्हणून रजनीकांत कदम, दीपक तारी यांचा सत्कार झाला. 
यावेळी रमेश जामसंडेकर आदींनी मनोगते व्यक्त केली. विजय पालकर प्रास्ताविक, नीलेश जोशी यांनी सूत्रसंचालन, तर आनंद मर्गज यांनी आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranjeet Desai comment