संभाजीराजेंना कोणी फसवले हे जनतेने ठरवावे; दाणवेंचा पलटवार

संभाजीराजे आणि राजांच्या गादीचा मान भाजपने राखला होता, मात्र..
konkan political News
konkan political Newssakal
Updated on: 
Summary

संभाजीराजे आणि राजांच्या गादीचा मान भाजपने राखला होता, मात्र..

रत्नागिरी - संभाजीराजे छत्रपती हे राजे आहे. मी प्रदेशाध्यक्ष असताना निवडणुक प्रक्रियेत भाग न घेता त्यांना राष्ट्रपती कोट्यातून सन्माने निवडून आणले होते. संभाजीराजे आणि राज्यांच्या गादीचा मान भाजपने राखला होता. आता संभाजी राजे यांनीच शिवसेनेने शब्द फिरवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जनतेने ठरवावे की संभाजीराजे यांना कोणी फसवले, असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपने संभाजीराजे यांना फसवलं असून स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांची ढाल केली, असा गंभीर आरोप केला आहे. त्यावर दानवे यांनी पलटवार केला आहे. आज ते रत्नागिरीत बोलत होते. (konkan political News)

यावेळी ते म्हणाले, राज्यसभेच्या सहा जागांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीवरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. कोल्हापूरचे श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने पक्ष प्रवेशाचे निमंत्रण देऊन उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संभाजी राजे यांनी स्वाभिमान ठेवत सेनेत आपला शब्द फिरवला असे स्पष्ट करून प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा शिवसेनेने अपक्षांना पाठिंबा न देता थेट कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

konkan political News
'स्वार्थासाठी भाजपनं संभाजीराजेंची ढाल केली', राऊतांचा निशाणा

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने संभाजीराजे यांना फसवल्याचा आरोप केला असून यावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यासंदर्भात बोलताना भाजपचे रावसाहेब दानवे म्हणाले, संभाजाराजे हे छत्रपती घराण्याचे राजे आहेत. त्यांना आम्ही राष्ट्रपती कोट्यातून सन्मानाने निवडुन आणले होते. पंतप्रधानांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सन्मान ठेऊन जागा दिली होती. राजे आणि राजांच्या गादीचा मान भाजपने राखला होता. त्यामुळे भाजपने संभाजीराजेंना डावलेले नाही. उलट संभाजीराजे यांनीच शिवसेनेने शब्द फिरवला असा आरोप केला आहे. त्यामुळे राजेंना कोणी फसवले याचा आता जनतेने विचार करावा, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

या पत्रकार परिषदेसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार, अॅड. बाबा परुळेकर, विलास पाटणे आणि राजन तेली आदी उपस्थित होते.

काय म्हणाले आहेत खासदार राऊत?

भाजपने संभाजीराजांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने स्वतःच्या उमेदवारीसाठी आणि स्वार्थासाठी संभाजीराजे छत्रपतींची ढाल केली आहे. या सर्व घडामोडींवर राज्य सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी होणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

konkan political News
'आम्हाला घोडे बाजार करायचा नाही, महाआघाडीने एक उमेदवार मागे घ्यावा'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com