Sanjay Raut I राऊतांची काँग्रेसवर नाराजी, राज्यसभा उमेदवारीवर दिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut News

'स्वार्थासाठी भाजपनं संभाजीराजेंची ढाल केली', राऊतांचा निशाणा

सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. या निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला असल्याचे चित्र आहे. पक्षातील राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी गाठीभेटी सुरु केल्या आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपने संभाजीराजे यांना फसवलं असून स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपाने संभाजीराजे छत्रपती यांची ढाल केली, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे. याशिवाय राज्यसभा उमेदवारीवरून राऊतांची काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. आज ते मुंबईत बोलत होते.

हेही वाचा: केरळमध्ये मान्सूनचं आगमन; उकाड्याने त्रस्त जनता सुखावली!

ते म्हणाले, भाजपने संभाजीराजांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने स्वतःच्या उमेदवारीसाठी आणि स्वार्थासाठी संभाजीराजे छत्रपतींची ढाल केली आहे. या सर्व घडामोडींवर राज्य सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी होणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढे कॉंग्रेसवर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, काँग्रेसने देशभरात अनेक ठिकाणी त्यांच्या पक्षातील नेत्यांची सोय केली आहे. काँग्रेसने राज्यातील उमेदवार दिला असता तर बरं झालं असतं. स्थानिक उमेदवारीमुळे काँग्रेसचे राजकीय वर्तुळात वजन कायम रहायला मदत झाली असती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राज्यसभा उमेदवारीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढण्याचे घोषित केले. मात्र त्यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापुरातील शिवसैनिक संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. दरम्यान, शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत यांनी दोन दिवस कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जाहीर सभा घेतल्या आहेत. याशिवाय त्यांनी कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचीही भेठ घेतली आहे. आता राऊतांनी भाजपावर पुन्हा एकदा आरोप केल्याने यावर भाजप काय प्रतिक्रिया देत ते पहावं लागणार आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादी सोबत शपथ घेताना भाजपने हिंदुत्वाचा विचार कुठे ठेवलेला?

Web Title: Sanjay Raut Criticises Bjp On Rajya Sabha Election 2022 Also Reaction Of Congress Candidate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top