esakal | रापणीची जाळी लाटांमुळे तुटली
sakal

बोलून बातमी शोधा

मुणगे : रापणीची जाळी लाटांमुळे तुटली

मुणगे : रापणीची जाळी लाटांमुळे तुटली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुणगे : येथील नवी रापण आपई संघाची समुद्रामध्ये अचानक वाढलेल्या पाण्याच्या लाटांमुळे रापणीची जाळी खडकांना लागून तुटून वाहून गेली. यामुळे त्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: सामान्यांच्या ताटातून भाजी गायब

रापणीद्वारे मच्छीमारीस सुरूवात झाली आहे. त्या अनुषंगाने काल (ता. ८ ) सकाळी रापणीद्वारे मच्छीमारी करण्यासाठी येथील नवी रापण संघ मुणगेचे अध्यक्ष दाजी मोर्वेकर, सचिव कृष्णा ऊर्फ दादा सावंत, अशोक मुणगेकर, संतोष ठुकरूल, नारायण सावंत, कुणाल सावंत, दीपक पाटकर, संजय परब, दाजी सावंत, बाबू राणे, हरिष परब, बाळकृष्ण परब आदींनी होडीतून रापणीची जाळी पाण्यात सोडली होती. जाळी पाण्यात सोडून त्यांनी होडी समुद्र किनारी आणली व त्यानंतर रापणीची जाळी ओढण्यास सुरुवात केली. यावेळीही समुद्राच्या अचानकपणे वाढलेल्या पाणी व लाटांमुळे रापणीची जाळी समुद्रातील खडकांमध्ये अडकली. पाण्याच्या लाटांमुळे सुमारे २४/ २५ पाटे (जाळ्याचे जोडलेले भाग) वाहून गेले. त्यामुळे जाळ्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. ऐन मासेमारीच्या काळात रापण संघाचे मोठे नुकसान झाले आहे. या रापण संघामधील सर्व सदस्य हे मोलमजुरी करणारे असल्याने झालेले नुकसान आणि आता ऐन मासेमारीच्या काळात होणारे आर्थिक नुकसान यामुळे खचून गेले आहेत.

भरपाईसाठी प्रयत्न करावेत

मागील वर्षीही अशाच पद्धतीने मासेमारीच्या काळात पाऊस होता. त्यामुळे रापण संघांना रापणी लावण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले होते. याबाबत मत्स्य विभागाने झालेल्या नुकसानाची पाहणी करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी रापण संघाचे अध्यक्ष दाजी मोर्वेकर, सचिव कृष्णा ऊर्फ दादा सावंत आणि रापण संघाच्या सदस्यांनी केली आहे.

loading image
go to top