esakal | सांगलीत मॉर्निंगवॉकसाठी आलेल्या 60 नागरिकांची रॅपिड अंटीजन चाचणी

बोलून बातमी शोधा

Sangli

सांगलीत मॉर्निंगवॉकसाठी आलेल्या 60 नागरिकांची रॅपिड अंटीजन चाचणी

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रातील मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या 60 नागरिकांची अचानक रॅपिड एंटीजन चाचणी करण्यात आली. यामध्ये एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. मंगळवारी महापालिकेच्या क्षेत्रात तब्बल 203 कोरोना रुग्ण आलेले आहेत. त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज सकाळी शहरात मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अंटिजेन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत मल्टिप्लेक्स परिसरात सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांची महापालिकेच्यावतीने चाचणी सुरू करण्यात आली. 60 नागरिकांची तपासणी झाली यामध्ये एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा: 'नमस्कार उद्धव साहेब...अजित दादा', चिमुकलीने मांडलं कलाकारांचं दु:ख

आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, गेल्या काही दिवसात सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध घातले असले तरी नागरिक हे निर्बंध पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी आज सकाळी अचानक एंटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये एकूण 60 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एका नागरिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशीच रॅपिड एजंट पोस्ट मोहीम मिरज आणि कुपवाड शहरात राबविण्यात येणार आहे. याच बरोबर सांगलीतही विविध भागात ही मोहीम सुरू होणार आहे.

आयुक्त कापडणीस म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची त्रिसूत्री पाळावी, तसेच शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे ही अंमलबजावणी करावी.