

Researcher Deciphers 127-Year-Old Shiva Temple Inscription Near Alibag
esakal
-सुनील पाटकर
महाड: रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील कुसुंबळे येथील प्राचीन शिवमंदिराच्या जोत्यावर कोरलेला ब्रिटिशकालीन शिलालेख इतिहास संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. शके 1820 (इ.स.1898) मधील हा चार ओळींचा शिलालेख कोकण इतिहास परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष महाड येथील प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी शोधून त्याचे वाचन केले आहे.या शिलालेखामुळे कोकणातील शैव परंपरा, मंदिर व्यवस्थापन आणि पुरी संप्रदायाच्या कार्याचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज प्रथमच प्रकाशात आला आहे.