Raigad Wildlife: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! अंबा नदीत आढळला परदेशी व दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' मासा; रायगडमध्ये दुर्मिळ परदेशी माशाचा शोध

Foreign fish species found in Maharashtra river: अंबा नदीत उत्तर अमेरिकन दुर्मिळ ‘अल्बिनो एलीगेटर गार’चा मृतदेह; रायगडमध्ये परदेशी प्रजातीमुळे स्थानिक जलजीवांना धोका
Unusual Discovery in Raigad: Rare Albino Alligator Gar Fish Found in River

Unusual Discovery in Raigad: Rare Albino Alligator Gar Fish Found in River

esakal

Updated on

-अमित गवळे

पाली: सुधागड तालुक्यातील वावे गावाजवळून वाहणाऱ्या अंबा नदीच्या पात्रात एक अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण मासा आढळून आला आहे. या परदेशी प्रजातीच्या माश्याचे नाव 'अल्बिनो एलीगेटर गार' असून तो चमकदार पिवळ्या आणि नारंगी रंगाचा आहे. शुक्रवारी (ता. 10) सकाळी वावे येथील स्थानिक तरुण कैलास हिलम आणि केतन म्हसके हे नेहमीप्रमाणे नदीकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान त्यांना नदीपात्रात हा आकर्षक रंगाचा मासा मृत अवस्थेत पडलेला दिसून आला. नदीत असा अनोखा जीव पाहताच परिसरात याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com