Indian Courser: रत्नागिरीत आढळला दुर्मीळ धाविक पक्षी; पक्षी निरीक्षक प्रसाद गोखले; कोकणात अत्यल्प नोंदी

Rare Indian Courser Spotted in Ratnagiri: रत्नागिरीतील चंपक मैदान परिसरात दुर्मीळ धाविक (Indian Courser) पक्ष्याची नोंद झाल्याने पक्षी अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Indian Courser

Indian Courser

esakal

Updated on

रत्नागिरी: शहराजवळील चंपक मैदान परिसरात एका पक्ष्याच्या पिल्लांचे निरीक्षण करताना टिटवीसदृश पक्षी आढळला. पुस्तके व इंटरनेटवरून याची अधिक माहिती घेता हा पक्षी धाविक (इंडियन कर्सर) असल्याचे पक्षीनिरीक्षक प्रसाद गोखले यांना समजले. हा पक्षी कोकणात दुर्मीळ मानला जातो. धाविक हा भारतातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण, जमिनीवर धावणाऱ्या पक्ष्यांपैकी एक आहे. पक्षी निरीक्षक प्रसाद गोखले यांनी या पक्ष्याचे फोटो काढले आहेत. कोकणात या प्रजातीच्या अत्यल्प नोंदी आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com