पाली - माणगाव मधील खांदाड येथे शुक्रवारी (ता.18) रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास भरवस्तीत दुर्मिळ खवले मांजर आढळून आले. येथील तरुणांनी खवले मांजराचे रक्षण करत वनविभागाकडे सुपूर्द केले. यावेळी वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी खवले मांजराबद्दल तरुणांना मार्गदर्शन केले.