मिसळमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या

अमित गवळे
गुरुवार, 18 एप्रिल 2019

- सुधागड तालुक्यात घडला हा प्रकार.

- मिसळमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या.

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील परळी बाजारपेठेतील एका प्रसिद्ध हॉटेलातील मिसळमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. चार महिला ग्राहकांनी गुरुवारी (ता.18) मागविलेल्या एका मिसळीच्या थाळीत या उंदराच्या लेंड्या होत्या.

परळीच्या मुख्य बाजारपेठेतील एका हॉटेलात चार महिला ग्राहक गुरुवारी (ता.18) मिसळ खाण्याकरीता दुपारी दोनच्या सुमारास गेल्या होत्या. त्यातील एका मिसळ थाळीत उंदराच्या लेंड्या असल्याचे त्यांना दिसले. ग्राहक मोनाली वाघमारे व अन्य ग्राहकांनी ही बाब हॉटेल मालकाच्या निदर्शनास आणून दिली असता सुरवातीला त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर हा विचित्र प्रकार पाहून हॉटेलात उपस्थित असलेल्या अन्य ग्राहकांनीही आवाज उठविल्याने हॉटल मालकाने नरमाईची भूमिका घेतली.

दरम्यान, पाली-सुधागड तहसीलदार व सुधागड तालुका आरोग्य विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rat shit found in Misal in Pali