esakal | Konkan Rain Update: चिपळूण, दापोलीला सतर्कतेचा इशारा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - चिपळूण तालुक्‍याला शनिवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपले.

Konkan Rain Update: चिपळूण, दापोलीला सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसात जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यात रविवारी (ता. ५) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रभर चिपळूण, दापोलीला पावसाने झोडपले. तसेच जगबुडी, वाशिष्टी नदीत पाणी वाढल्याने परत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मंडणगड, गुहागर, दापोली, चिपळूण ,लांजा, राजापूर, संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.चिपळूणमध्ये जुन्या बाजार पूल येथे पाणी आले आहे. मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले.

हेही वाचा: Good News: गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी RTPCR चे बंधन नाही

नागरिकांनी धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये. अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या ३-३ रांगा करू नयेत. प्रवासात आवश्यक खबरदारी घ्यावी. घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. घराभोवती विजेचे खांब किंवा तारा, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे. पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. जवळ दैनंदिन लागणारी औषधे, केरोसीन वर चालणारे बंदिस्त दिवे बॅटरी, गॅसबत्ती, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात. अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र व खाडी किनारी तसेच नदी किनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

loading image
go to top