

Ratnagiri's low-enrollment primary schools face possible merger under the new government policy.
esakal
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील १ ते ५ पटसंख्या असलेल्या ४०० प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाच्या नव्या धोरणानुसार अत्यंत अल्प पटसंख्येच्या शाळांचे नजीकच्या शाळांमध्ये समायोजन (विलीनीकरण) करण्यात येणार असून, त्यासाठीची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूरवरच्या शाळेपर्यंत पायपीट करावी लागणार आहे.