लॉकडाऊनसाठी प्रशासन सकारात्मक; निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

लॉकडाऊनसाठी प्रशासन सकारात्मक; निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
Updated on

रत्नागिरी : कोरोनाचे (Covid 19)रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्यात कडक टाळेबंदी (Lockdown) करण्या संदर्भात प्रशासन सकारात्मक आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. 28) आढावा घेतला. आठ दिवस टाळेबंदीबाबत पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब (Guardian Minister Adv. Anil Parab)यांच्याशी चर्चा करुन मुख्यमंत्र्यांकडे ही बाब मांडणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय(Minister of Higher and Technical Education Uday Samant) सामंत यांनी दिली. जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

(ratnagiri-8-day-lockdown-update-covid-19-kokan-news)

ते म्हणाले, कोरोनासंदर्भातील परिस्थितीबाबत रत्नागिरीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासह आरोग्य अधिकार्‍यांची बैठक झाली. कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण 66 टक्केवरुन 86.98 टक्केवर पोचले आहे. ही जिल्ह्यासाठी समाधानकारक बाब आहे.

सध्या 3 हजार 356 बाधित उपचाराखाली आहेत. मात्र मृत्यूदर 3.31 टक्के झाला आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे. या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी कडक लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, असे सर्वच अधिकार्‍यांनी सुचित केले आहे. हा पर्याय अवलंबण्याबाबत मंत्रीस्तरावर चर्चा केली जाईल.

पालकमंत्री अ‍ॅड. परब यांच्याशी चर्चा करुन लॉकडाऊनसाठी मुख्यमंत्र्यांपुढे प्रस्ताव सादर केला जाईल. त्यांनी परवानगी दिल्यानंतर रत्नागिरीतील व्यापारी वर्गाशी चर्चा केली जाईल. सर्वाना विश्‍वासात घेऊन त्यानंतर याची अंमलबजावणी केव्हा करायची यावर निर्णय घेतला जाईल. लॉकडाऊनची घोषणा करण्यापुर्वी केंद्र शासनाच्या निकषानुसार नागरिकांना 48 तास आधी कळवण्यात येईल. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रशासन घेईल. टाळेबंदीमुळे आठ दिवसांनी कोरोनाचे बाधितांसह मृत्यूदरावर नियंत्रण राहू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com