Amba Ghat road damage Ratnagiri latest news
esakal
रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे आंबा घाटात दरड कोसळून रस्ता खचल्याने ठप्प झालेल्या वाहतुकीवर कायमस्वरूपी आणि जलद उपाय शोधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने पावले उचलली आहेत. आंबा घाटात खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एरडॉक्स प्लेट्सचा वापर केला जाणार (Amba Ghat road damage Ratnagiri latest news) आहे. खचलेला रस्ता पुन्हा भक्कम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, गणेशोत्सवापूर्वी हे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.