Mumbai Goa Highway police van accident
esakal
लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी घाटात शनिवारी (ता. ३१) मध्यरात्री झालेल्या अपघातावेळी कंटेनरच्या धडकेनंतर पोलिस व्हॅन दोनशे फूट दरीत कोसळली. ती बाहेर काढण्याचे आव्हान बचाव पथकासमोर (Mumbai Goa Highway police van accident) होते. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने ही अपघातग्रस्त व्हॅन बाहेर काढण्यात आली. रात्रीच्या काळोखात घडलेल्या या दुर्घटनेनंतर बचावकार्य आणि वाहन बाहेर काढण्यासाठी यंत्रणांना मोठी कसरत करावी लागली.