रत्नदुर्ग माउंटेनिअर्स, व्हाईट आर्मीने उचलला खारीचा वाटा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

रत्नागिरी - चिपळुण तालुक्‍यातील तिवरे धरण फुटून मोठी मनुष्यहानी झाली. या प्रसंगी रत्नागिरीतील रत्नदुर्ग माउंटेनिअर्स, व्हाईट आर्मीच्या सभासदांनी तेथे जाऊन बचाव व मदत कार्यात खारीचा वाटा उचलला. शोधकार्यात मृतदेह बाहेर काढण्याचे कामही अन्य सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने केले.

तिवरेची घटना कळल्यानंतर रत्नदुर्गचे वीरेंद्र वणजू, गणेश चौघुले, जितेंद्र शिंदे, किशोर सावंत, गौतम बाष्टे व पराग सुर्वे यांनी बचावकार्यात भाग घेण्यासाठी तत्काळ तिवरे गाठले. जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन समिती, एनडीआरएफ, वैद्यकीय सेवा, जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्ष, जिल्हा पोलिस यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्परता दाखवली. तसेच सरकारी यंत्रणेबरोबर विविध सामाजिक संस्थांनी राबविलेले मदतकार्यही तेवढेच मोलाचे ठरले. त्यामुळेच पहिल्या दिवशी 16 मृतदेह हाती लागले. 

व्हाईट आर्मीचे पथक तिवरे घटनास्थळी

दरम्यान, मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्‍यातील तिवरे धरण फुटून बारा घरे वाहून गेली आहेत. चोवीस लोक बेपत्ता झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर शोधमोहिमेसाठी बुधवारी दुपारी येथील व्हाईट आर्मीचे पथक रवाना झाले आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास प्रत्यक्ष घटनास्थळी पथक पोचले असून मदतकार्याला या पथकाने प्रारंभ केला. उज्वल नागेशकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत शेंडे, सचिन भोसले, प्रदीप ऐनापुरे, विनायक भाट, शैलेश रावण, प्रेम सातपुते, सारंग माळी, सुमित साबळे, वैभव गायकवाड, सुनील दळवी, शुभम हळदे, अमित कांबळे अशी एकूण तेरा जणांचे पथक  मोहिमेत सहभागी झाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Dam Mishap Ratnadurg Mountaineers, white Army help