Ratnagiri Dam Mishap : आपत्तीग्रस्तांचे धरण माथ्यावर स्थलांतर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

चिपळूण - अमावस्येच्या रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर 23 लोक पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर पुराच्या लोंढ्यात 12 ते 13 घरे जोत्यासकट वाहून गेली. दरम्यान घरे गमावलेल्या लोकांचे सध्या तिवरे हायस्कूल स्थंलातर करण्यात आले. आपत्तीग्रस्तांना नवीन शासकीय घरे मिळेपर्यंत धरणाच्या बाजूस असलेल्या टेकडीवरील दोन खासगी व एका शासकीय इमारतीत या साऱ्यांचे स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

चिपळूण - अमावस्येच्या रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर 23 लोक पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर पुराच्या लोंढ्यात 12 ते 13 घरे जोत्यासकट वाहून गेली.

दरम्यान घरे गमावलेल्या लोकांचे सध्या तिवरे हायस्कूल स्थंलातर करण्यात आले. आपत्तीग्रस्तांना नवीन शासकीय घरे मिळेपर्यंत धरणाच्या बाजूस असलेल्या टेकडीवरील दोन खासगी व एका शासकीय इमारतीत या साऱ्यांचे स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

प्रशासनाकडून तिवरे हायस्कूलमध्ये सध्या 40 लोकांची निवास व्यवस्था करण्यात आली. हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीचे तिन वर्ग असून 93 विद्यार्थी संख्या आहे. शाळेच्या हॉलमध्ये 40 लोकांची व्यवस्था केली आहे. शाळा सुटल्यानंतर रात्री निवासासाठी तिन वर्ग उपलब्ध करून दिले जातात. तिवरे धरणाच्या वरील बाजूस दोन खासगी घरे आहेत. तसेच एक पाटबंधारे विभागाचे कार्यालय देखील आहे.

पाटबंधारे कार्यालयाची डागडुजी केली जाईल. इमारतीवर स्वतंत्र शेड उभारण्याचे नियोजन आहे. जेणेकरून या तिन्ही घरामध्ये 40 लोकांची निवास व्यवस्था एकत्रित करता येईल. यासाठी खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज नियोजित जागेची पाहणी केली. स्थानिक ग्रामस्थांशीही त्यांनी संवाद साधला.

धरणावरील जागेत तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले. शासकीय घरे बांधणीसाठी ग्रामस्थांनी जागा सुचवावी. जागेची अडचण असल्यास प्रशासन जागा उपलब्ध करून देईल. पुनर्वसना ठिकाणी घरे बांधण्याबाबत ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Dam Mishap Tivare special story