Ratnagiri Dam Mishap :भगदाड पडल्याचे वृत्त सकाळने केले होते प्रसिद्ध 

नागेश पाटील
बुधवार, 3 जुलै 2019

चिपळूण - तालुक्‍याच्या टोकाला असलेल्या तिवरे धरणास गळतीने धरणातील पाणीसाठा कमी झाला. शिवाय या गळतीमुळे धरणाच्या मुख्य दरवाज्याशेजारी भगदाड पडले आहे. याची वेळेत दुरुस्ती न केल्यास तिवरेतील विविध वाड्यांसह दसपटीतील चार ते पाच गावांना धोका पोहोचण्याची शक्‍यता आहे. या संदर्भातील वृत्त दैनिक सकाळने मे महिन्यात प्रसिद्ध केले होते. पण या दुर्घटनेमुळे याकडे दुर्लक्ष झाल्याचे आता समोर आले आहे. 

दापोली लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले तिवरे धरण 2000 रोजी पूर्णत्वास गेले. गेल्या काही वर्षात या धरणाची फारशी दुरुस्ती झालेली नाही. या धरणातील पाण्याचा दसपटीतील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीला उपयोग होतो. दोन वर्षापूर्वी धरणाला लहानशी गळती लागली होती. गतवर्षी या गळतीत वाढ झाली.

दरम्यान, गळतीमुळे ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्यानंतर आमदार सदानंद चव्हाण, प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले यांनी गतवर्षी संयुक्त पाहणी केली होती. त्यानंतरही दुरुस्तीला वेग आला नाही. गळतीमुळे धरणाच्या मुख्य दरवाजाशेजारीच मोठे भगदाड पडले होते. धरणातील पाणी वाहून गेल्याने पाणीसाठाही कमी झाला होता. याबाबत प्रशासनाकडे माहिती देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. 

धोक्‍याच्या  सुचना सकाळकडून
धरणाच्या खालील बाजूस तिवरेतील भेंदवाडी, गंगेचीवाडी, फणसवाडी, गावठाण आदी वाड्या आहेत. नदीकिनारीच ओकले, कादवड, वालोटी, रिक्‍टोली ही गावे वसली आहेत. पावसाळ्यापूर्वी धरणाची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात धरणाला धोका पोचण्याचा संभव आहे. यातून तिवरेसह नदीकाठच्या गावांना फटका बसण्याची शक्‍यता आहे. असे वृत्त दैनिक सकाळने यापूर्वीच प्रसिद्ध केले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Dam Mishap Tiware dam