
मानेवर सुरा ठेवून मुलाकडून बापाचे अपहरण, देवरूखमध्ये धक्कादायक नाट्य
esakal
Highlight Summary Points
पैशांसाठी जन्मदात्याचे अपहरण:
संगमेश्वर तालुक्यातील श्रीकांत मराठे या ४५ वर्षीय पुत्राने आपल्या ८० वर्षीय वडिलांचे पैशांसाठी अपहरण करून त्यांचा हात-पाय बांधलेला फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून एक लाख रुपयांची खंडणी मागितली.
आईचे धाडस आणि पोलिसांची तत्परता:
आई सुनीता मराठे यांनी तत्काळ देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी वेगाने कारवाई करत चिपळूण परिसरातून संशयिताला अटक केली.
खंडणी, अपहरण आणि धमकीचे गुन्हे नोंद:
पोलिसांनी श्रीकांत मराठेवर खंडणी, अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.
Ratnagiri Father Kidnapped By Son : संगमेश्वर तालुक्यात वृद्ध वडिलांचे पैशांसाठी अपहरण करणाऱ्या पुत्राला चिपळूण पोलिसांनी गजाआड केले आहे. ही घटना मंगळवारी (ता. १४) दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली. त्याने आपल्या वडिलांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपहरण केले. श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५, रा. चोरपऱ्या, देवरूख ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने आपल्या जन्मदात्याच्या मानेवर सुरा ठेवून पैशांसाठी पळवून नेले आणि नंतर व्हॉट्स अॅपवर हात-तोंड बांधलेला फोटो पाठवून एक लाख रुपयांची खंडणी मागितली.या प्रकाराची देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार त्याच्या आईने सुनीता दत्तात्रय मराठे (वय ७४) यांनी दाखल केली.