Dhamanse Hatwadi Bridge Ratnagiri
esakal
रत्नागिरी : धामणसेमधील सोमगंगा नदीवरील हटवाडी पुलाचे काम पूर्ण झाले असून, या विकासकामामुळे धामणसे परिसराच्या विकासाला नवी गती मिळाली (Somganga River Dhamanse tourism) आहे. येथील नदीत आगळावेगळा बंधारा बांधल्याने येथे दररोज शेकडो पर्यटक येऊ लागले आहेत. अर्धगोलातील बंधाऱ्यामुळे येथे पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.