रत्नागिरी : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत-पाकिस्तान युद्धाची ठिणगी पडली आणि जिल्ह्यातील सैनिकांनी (Army Jawan) देशासाठी दिलेले बलिदान आणि योगदानाच्या स्मृती जाग्या झाल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजवर देशासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या जिल्ह्यातील ३५ जवानांना वीरमरण आले. एकूण ३ हजार ७८३ माजी सैनिकांची नोंद असून ३ हजार ९२९ विधवा आहेत. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून ही आकडेवारी मिळाली.