रत्नागिरीत एक जुलैपासून हे राहणार सुरु, हे राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

1 जुलैपासून नेमके काय सुरू राहणार, काय बंद राहणार आणि कोणत्या वेळेत चालू राहणार याबाबत कोणतीही माहिती नव्हती.

रत्नागिरी - जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या कडक आठ दिवसांच्या लॉकडाउनची अंमलबजावणी आज रात्री बारा वाजता होणार आहे. आज सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाची कोणतीही मार्गदर्शन सूचना न मिळाल्याने काहीशी संभ्रमावस्था होती; मात्र साडेपाच वाजण्याच्या सुमारास जिल्हा प्रशासनाने आदेश जारी करून नेमके काय सुरू राहणार आणि काय बंद याचे परिपत्रक काढले.

यामध्ये अत्यावश्‍यक सेवा, शासकीय, खासगी आस्थापना आणि उद्योग सुरू राहणार आहे, मात्र सायंकाळी 5 ते सकाळी 9 या दरम्यान आरोग्य तपासणी कारण वगळता अन्य कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडण्यास संबंधित तहसीलदारांची परवानगी आवश्‍यक आहे. 

1 जुलैपासून नेमके काय सुरू राहणार, काय बंद राहणार आणि कोणत्या वेळेत चालू राहणार याबाबत कोणतीही माहिती नव्हती. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व सीमा बंद (अत्यावश्‍यक सेवा वगळून), दुचाकी, रिक्षा, तीन चाकी, जीप, बस बंद राहणार आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व दुकाने आस्थापना बंद. मास्क वापर बंधनकारक आहे. अत्यावश्‍यक सेवेसाठी जाणाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग अवश्‍यक आहे. दुकानात एकाचवेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना उपस्थित राहता येणार नाही. थुंकण्यास मनाई आहे. त्यावर कायदेशीर शिक्षा करण्यात येईल. कामाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनर, साबण, सॅनिटायझर प्रवेशाच्या ठिकाणी आवश्‍यक आहे. 

हे राहणार सुरू... 

अत्यावश्‍यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन, अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालय कर्मचारी, अधिकारी 10 टक्के उपस्थिती, पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा व्यवस्थापन, स्वच्छता आदी व्यवस्था, सर्व बॅंका, पोस्टल, कुरिअर सेवा, दूरध्वनी, इंटरनेट सेवा, आयटी आस्थापना, ऑनलाइन शिक्षण, ई-कॉमन सर्व्हिस, अन्नधान्य, भाजीपाला, दूध व दुधाचे पदार्थ, किराणा माल, मांस, मासे, अंडी यांची विक्री दुकाने बुधवार, शुक्रवार, रविवार, रुग्णालये, सर्व वैद्यकीय आस्थापना, औषधालये, पाळीव प्राणी पशुवैद्यकीय आस्थापना व दुकाने, सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय व त्यांच्या आस्थापना, ऑइल, गॅस, पेट्रोलियम, आस्थापना व गोदामे, अंत्ययात्रेसाठी 20 व्यक्ती मर्यादा (कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याचा विचार करून) शासकीय कामे, शेतीविषयक कामे, कृषीमाल प्रक्रिया आणि साठवणूक, सर्व बंदरे व त्याच्याशी निगडित व्यवसाय सुरू राहतील. मद्य विक्री ऑनलाइन सुरू ठेवण्यात येणार आहे. "निसर्ग' चक्रीवादळाने नुकसानाची पुनर्बांधणी, पंचनामे, मदत वाटप सुरू राहणार. आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहणार. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri District Lock Down From One July