esakal | मृत्यूदरात रत्नागिरी  जिल्हा पहिल्या पाचात;  नवीन 19 रुग्ण सापडले
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri district ranks first in mortality new covid 19 found covid 19 kokan marathi news

19 नवीन रुग्ण ; खेडमधील एका महिलेचा मृत्यू, एकूण मृत्यू 359 

मृत्यूदरात रत्नागिरी  जिल्हा पहिल्या पाचात;  नवीन 19 रुग्ण सापडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :  जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 19 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनापुढे चिंतेची बाब ठरली आहे. खेड येथे एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 359 वर पोचली असून मृत्यूदर 3.66 टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहे. 

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची बैठक घेऊन सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात आज 19 नवीन कोरोना बाधित सापडले. त्यामध्ये आरटीपीसीआर 9, तर ऍण्टीजेन चाचणीमध्ये 10 बाधित सापडले.

हेही वाचा- पोलिसांचा घेतला चावा अन् ठोकली धुम; दोन पोलिस जखमी

रत्नागिरी तालुक्‍यात 6, खेड 1, चिपळूण 5, संगमेश्‍वर 6, राजापूर 1 रुग्ण सापडला. तर 14 जणांनी आज कोरोनावर मात केली असून आजवर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 305 झाली आहे. मात्र रुग्ण संख्या वाढू लागल्याने रुग्ण बरे होण्याचा प्रमाण घसरून 94.89 झाले आहे. जिल्ह्यात आज 258 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एकूण निगेटिव्ह स्वॅबची संख्या 76 हजार 600 आहे. जिल्ह्यात विविध कोविड सेंटरवर उपचार घेणाऱ्यांची संख्याही 110 झाली आहे. 
 

संपादन - अर्चना बनगे