esakal | ‘बल्क ड्रग्ज पार्क’ आता रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरुडात; रत्नागिरीला वगळले
sakal

बोलून बातमी शोधा

‘बल्क ड्रग्ज पार्क’ आता रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरुडात

प्रकल्पात एकूण ३० हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. यातून ७५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

‘बल्क ड्रग्ज पार्क’ आता रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरुडात

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

चिपळूण (रत्नागिरी) : राज्य सरकारकडून रायगड जिल्ह्यात सुमारे पाच हजार एकरमध्ये ‘बल्क ड्रग्ज पार्क’ (Bulk Drug Park) उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी रायगड ( Raigad)जिल्ह्यातील रोहा व मुरुड (Roha,Murud)तालुक्यात पाच हजार एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीऐवजी रायगड जिल्ह्याला बल्क ड्रग्ज पार्कसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी कृती आराखडा तयार केला जात आहे. त्यात एमआयडीसीचा वाटा मोठा असावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार देशातील काही ठिकाणी बल्क ड्रग्ज पार्क उभारणार आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे; मात्र केंद्राने अद्याप ठिकाण ठरवलेले नाही. राज्य सरकारनेही रायगड जिल्ह्यातील रोहा व मुरुड तालुक्यात पाच हजार एकर जागा निश्चित केली आहे.

रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि रोहा या तालुक्यातील १७ गावांच्या जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. कोणत्याही गावाचे स्थलांतर न करता हा प्रकल्प साकारणार आहे. प्रकल्पात एकूण ३० हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. यातून ७५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. महाराष्ट्राचा देशातील औषधे उत्पादनात २२ टक्के वाटा असून निर्यातीतील २० टक्के आहे. रिलायन्स लाइफ सायन्सेसकडून दिंडोरी येथे दोन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याबाबतचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला आहे.

हेही वाचा: सावधान: ‘हनी ट्रॅप’च्या विळख्यात इचलकरंजी ; 25 हून अधिक तरुण

औद्योगिकीकरण आणि आर्थिक विकासाचा विचार करताना परवाने, मान्यता या सर्व प्रक्रिया पुढील काळात अधिक सुलभ करणे आवश्यक आहे. सध्या उद्योग सुरू करण्यासाठी शेकडो कायदे, नियमांनुसार परवानग्या घ्याव्या लागतात. कुशल मनुष्यबळ हे महाराष्ट्राचे बलस्थान आहे. तंत्रज्ञानाबाबत तर आपण जपानलाही मागे टाकू. मात्र, औद्योगिक विकासासाठी पूरक वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. सुविधांची उपलब्धता आणि दळणवळण यंत्रणा सुलभ नसणे, या उद्योगांसमोरील मुख्य अडचणी आहेत. त्या तातडीने सोडवणे आवश्यक आहे,

- गजानन कदम, उद्योजक, खेर्डी..

त्या कंपन्यांना स्थानिकांचा विरोध

रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीत काही औषध निर्माण कंपन्या आहेत. अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्येही नव्याने काही कंपन्या येण्यास इच्छुक आहेत. लोटे, अतिरिक्त लोटे परिसरात औषध निर्माण कंपन्या आल्या तर येथेही ''बल्क ड्रग्ज पार्क''ची निर्मिती होईल. रोजगार उपलब्ध होऊ शकतो; मात्र केमिकल आणि औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांना स्थानिकांचा विरोध असल्यामुळे सरकारने रायगड जिल्हा बल्क ड्रग्ज पार्कसाठी निवडला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून नवीन माहिती व तंत्रज्ञान धोरण तयार केले जात आहे. राज्याची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत एक लाख कोटी डॉलर्सपर्यंत विस्तारण्यासाठी उद्योगवाढीचा आराखडा तयार असून निर्मिती, सेवा, माहिती व तंत्रज्ञान, बल्क ड्रग्ज पार्क, हवाई व संरक्षण क्षेत्र, अन्नप्रक्रिया, मनोरंजन क्षेत्र आदी विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र धोरणे तयार करून उद्योगांना आकर्षक सवलती देण्यात येत आहेत.

- आदिती तटकरे, उद्योग राज्यमंत्री

loading image
go to top