

Maharashtra Ratnagiri Dams Face Water Leakage Amid Drought 500 Crore Repair Proposal Sent for Government Approval
sakal
रत्नागिरी : दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्यातील धरणांमधील पाणीगळतीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील १० धरणांना गळती लागली असून, यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. बाष्पीभवनाचे वाढते प्रमाण आणि यावर्षी झालेला अल्प पाऊस यामुळे आधीच जलसाठे खालावत चालले आहेत, त्यातच ही गळती संकटात आणखी भर घालत आहे.